केएआयजेएस बँक इतिहास
 

माजी अध्यक्ष

मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा). संस्थापक अध्यक्ष
मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) हे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते ०७.०२.१९६३ पासून ०४.११.१९७६ पर्यंत अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेसाठी पूर्ण योगदान दिले. त्यांचे अथक परिश्रम व निरंतर प्रोत्साहन यांच्या माध्यमातून जनता बँक महाराष्ट्रातील सर्वात मोठी शेड्यूल्ड सहकारी बँक बनली आहे आणि आज कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँक म्हणून गर्वाने कार्यरत आहे. बँकेचा विकास व विकासाची गती यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची जिद्द व प्रेरणा या गोष्टी महत्वाच्या आहेत.माजी अध्यक्ष यादी


श्री शंकरराव रामचंद्र हुपरे
०५.११.१९७६ पासून ०३.११.१९८५ पर्यंत बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी श्री शंकरराव हुपरे यांच्या खांदयावर होती. श्री शंकरराव हुपरे हे स्व. नारायणराव घोरपडे यांचे शिष्य होते. ते त्यांच्याप्रमाणेच गतिमान आणि उत्साही होते. इचलकरंजी तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर बँकेचा विस्तार करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.

श्री भूपाल बळवंत कागवाडे
हुपरे यांच्या नंतर बँकेची सर्व जबाबदारी भूपाल बळवंत कागवाडे यांच्या हाती देण्यात आली. त्यांनी २३.११.१९८५ पासून ०५.०९.१९९५ पर्यंत बँकेच्या अध्यक्ष पदावर काम पहिले आणि ३०.०८.२००५ ते ०९.०३.२००८ या काळ खंडासाठी ते पुन्हा नियुक्त झाले. व्यवस्थापन आणि बँकेची प्रगती व कर्मचारी यांच्या बद्धल सकारात्मक दृष्टीकोन यांच्या आधारे बँकेच्या विकासामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

श्री द-याप्पा गुरुपादप्पा कोरे
श्री द-याप्पा गुरुपादप्पा कोरे हे ०६.०९.१९९५ पासून ०८.०२.१९९८ पर्यंत अध्यक्ष होते त्यांच्या कारकीर्दीमध्ये बँकेसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये त्याचे कार्य मह्त्वाचे आहे.

श्री अशोक बाळकृष्ण सौंदतीकर
०९.०२.१९९८ पासून १९.०८.२००५ पर्यंत अध्यक्षता स्वीकारली होती. त्यानंतर १०.०३.२००८ रोजी पुन्हा अध्यक्ष पदासाठी नियुक्त झाले ते आजतागायत बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे आणि प्रभावीपणे हाताळत आहेत. सहकारी बँकांमध्ये ते एक अनुभवी बँकर म्हणून सर्वांनाच ज्ञात आहेत. गरीब वर्गासाठी कर्ज उपलब्ध करून देण्या साठी आग्रही, आर्थिक स्थिरतेसाठी निरंतर प्रयत्न, बँकेमध्ये अद्यावत तंत्रज्ञान लागू करण्यासाठी प्राधान्य या सर्व गोष्टी बँकेचा विकासफलक सहजच सांगून जातो.

डॉ श्री अशोक बाळकृष्ण सौंदतीकर
०९.०२.१९९८ पासून १९.०८.२००५ पर्यंत अध्यक्षता स्वीकारली होती. त्यानंतर १०.०३.२००८ रोजी पुन्हा अध्यक्ष पदासाठी नियुक्त झाले ते आजतागायत बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे आणि प्रभावीपणे हाताळत आहेत. सहकारी बँकांमध्ये ते एक अनुभवी बँकर म्हणून सर्वांनाच ज्ञात आहेत. कनिष्ठ वर्गासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही, आर्थिक स्थिरतेसाठी निरंतर प्रयत्न, बँकेमध्ये अद्यावत बाबी लागू करण्यासाठी प्राधान्य या बाबी बँकेचाविकास फलक सहजच सांगून जातो.


केएआयजेएस बँक

जलद बँकिंग

इंटरनेट बँकिंग

मोबाइल बँकिंग

Data NA

एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग आपल्या बोटांच्या टोकावर बँकिंग आणते.बँकने आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग सेवा सुरू केली आहे .अधिक वाचा

एटीएम / शाखा

तक्रार निवारण केन्द्र

आपली काही तक्रार असल्यास ,संपर्क करावा हि विनंती.   अधिक वाचा
केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »