केएआयजेएस बँक इतिहास
 

केएआयजेएस बँकेचा इतिहास

इचलकरंजी पूर्वीचे जहागिरीतील शहर. जहागीरदार कै. श्रीमंत नारायणराव बाबासो घोरपडे यांचे प्रयत्नाने महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणुन नांव लौकिक प्राप्त झालेले आजचे शहर. इचलकरंजी या शहराचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यानी त्याचे पूर्तीसाठी केलेल्या कार्याचे दृश स्वरूप म्हणजे उद्योग धंदयाने गजबजलेले आजचे इचलकरंजी शहर.या शहराचा विकास करण्याचा व उद्योग धंदा वाढविण्याचा ध्यास घेतलेले व चंग बांधलेले सहकार महर्षि कै. कदम आण्णा, त्यानी सहकाराशिवाय तरणोपाय नाही हे त्यांच्या दूरदृष्टीने त्याकाळी चूक जाणून अनेक सहकारी संस्थाची निर्मीती व उभारणी शहरातील अनेक मान्यवर नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून केली. त्यांनी उभारलेल्या अनेक सहकारी संस्थांपैकी इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.& ही एक होय. या बँकेचे नेतृत्व त्या वेळचे तरुण व विशिष्ठ ध्येयाने प्रेरित झालेले कार्यकर्ते म्हणजे माजी. खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कै. मा. शंकरराव हुपरे यांचेकड़े सोपवीले. या बँकेचे प्राथमिक भाग भांडवल कै. मा. शंकरराव हुपरे चालवित असलेल्या ;गणेश भिशितुन जमा केले गेले आर्थिक गरजा भागवीणेसाठी भिशीसारखी योजना अपुरी ठरते हे अनुभवाने जाणून त्या जमलेल्या रक्कमेतूनच भाग भांडवल जमा करुन ही संस्था दि.०५/११/१९६२ रोजी रजिस्टर झाली व दि. ०७/१२/१९६३ पासून प्रत्यक्ष्यात कार्याला सुरवात झाली.बँकेचे व्यवहार, व्याप प्रगती बघून एप्रिल १९८२ मधे रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग लायसेंस मीळाले.या सर्व प्रगतीला बँकेच्या स्थापनेपासून असलेले बँकेचे सर्व संचालक व सेवक यांची कर्तव्य दक्षता व अविरत श्रम कारणीभूत आहेत.

सुरवातीस सभासदांच्या आर्थिक गरजा विशिष्ठ मर्यादेपर्यंत भागविण्याचे धोरण ठरविले. आर्थिक गरजेच्या पुर्ततेसाठी व व्यवहारासाठी ठेवी गोळा करणे,इतर संस्थांकडून कर्जे मिळवीणे इत्यादी बाबी विचारात घेवून ठेवीच्या विविध योजना आखून त्यात सामान्य व्यक्तीचीही ठेव मिळेल अशा ठेव योजना राबविल्या. शहरातील इतर सहकारी संस्थांचे व्यवहार आमचे मार्फ़त सुरु केलेमुळे शिल्लक रक्कमा बँकेकडे ठेव रुपाने राहील्या. डेक्कन को. ऑप. स्पिनिंग मिल्स चे सूत वाटपाचे काम स्वीकारले, त्या करीता सभासदांना कर्जे उपलब्ध करुन दिली. जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक यांचे कडून कर्जे घेतली, त्या वेळी शहरात सुरु असलेल्या वस्त्रोद्योगाला यांत्रिक मागाच्या सहायाने आधुनीक स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरु होते. बँकेचे उत्पादक सभासदांना स्वतःचा हातामागाचे यांत्रिक मागात रूपांतर करणेस बँकेने प्रथम आर्थिक सहाय्य दिले, त्या नंतर त्यांचा व्यवसाय उत्पादक या नात्याने स्वतःचे होणेचे दृष्टीने खेळते भांडवल पुरविणेसाठी हळू हळू व जस जशी बँकेची आर्थिक स्थिती स्थिर व भक्कम होत गेली तस तसे धोरणे आखली व अर्थपुरवठा केला.
बँका ह्या जनतेच्या आर्थिक जीवनाशी निगडित असल्याने बँकेचे व्यवहार व धोरण हे नेहमी लोकाभिमुख असणे गरजेचे आहे हे लक्षात घेवून या बँकेचे संचालक व व्यवस्थापन नेहमीच कार्यरत राहिले. कर्जवाटप करतांना सभासदांचे हित, उद्योग/ व्यवसायाची गरज, उत्पादक उद्योगाला प्राधान्य, राष्ट्रीय विकासाभिमुख धोरण ठेवले. शहरातील यंत्रमाग व्यवसायाचा/ उद्योगाचा अभ्यास केला,गरज विचारात घेतली, ती नियमांच्या चौकटीत बसवली व तदनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिले, त्यामुळे यंत्रमाग व त्यांचे पूरक उद्योग निर्माण झाले. मजुरीचे काम करणारे यंत्रमागधारक, उत्पादक कारखानदार झाले. स्वतःच्या पायावर व्यवसाय उभा करण्याचे सामर्थ्य या बँकेने सभासदांना उपलब्ध करुन दिले. कर्तृत्ववान हाताला आर्थिक पाठबळ देवून त्यांना व्यवसायात स्थिर केले. समाजात त्यांची पत वाढवली. इचलकरंजी शहरातील बँकिंग क्षेत्रात या बँकेने सर्व प्रथम १९६३ साली हुंडी व्यवसाय सुरु करुन व्यापारी बंधुना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले. जनता बँक ही जनमाणसांच्या हिताकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहे हे दृष्य ज्यावेळी शहरातील जनतेपुढे आले त्यावेळी उत्स्फुर्तपणे जनतेने जनता बँकेला साथ दिली, बँकेवर विश्वास दाखविला. जिव्हाळा दिला. या विश्वास व श्रध्देवरच जनता बँक दिवसें दिवस वाढत राहिली. अधिक अधिक लोकांना सहभागी करुन घेवू शकली व लोकांच्या गरजा पूर्ण करु शकली, त्यामुळे जनता बँक ही केवळ सहकारी बँक न राहता जनतेची जिव्हाळ्याची, विश्वासाची,श्रध्देची बँक म्हणून पुढे आली. एक विचार, एकमेकातील सहकार्य व त्यामुळे सर्वांचा उद्धार या न्यायाने व बँकेबद्दल आत्मियतेने सर्व सभासदांनी सलग ५ वर्षे त्यांना मिळणांरा डिव्हिडंड न घेता तो इमारत फंडास वर्ग करण्याचा निर्णय घेवून तो अंमलात आणला. या सक्रिय सहकार्यतेमुळेच इचलकरंजी शहरात आमच्या बँकेची स्वतःची "जनता बँक भवन " ही पाच मजली भव्य वास्तु शहराच्या वैभावाची साक्ष व सहकारी भावनेचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून उभी आहे. Howइचलकरंजी, कोल्हापुर,जयसिंगपुर, गांधीनगर, मुंबई, पुणे, गडहिंग्लज, सांगली, कराड, औरंगाबाद मुख्याने अर्थपुर्वठा केला जातो.बँकेने आपले कर्ज वाटपाचे धोरण आखतांना उत्पादकांना, कुटिरोद्योगांना व दुर्बल घटकांना प्राधान्यपूर्वक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे अग्रक्रम क्षेत्राकरीता ठरवून दिलेल्या कर्ज वाटपाचा कोटा आम्ही केंव्हाच पूर्ण केला आहे.

तसेच किमान व्याज आकारणी करीत असल्याने सभासदांना आपोआपच योग्य मोबदल्यात कर्ज उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्पादनात भरच पडत आहे व ते स्वावलंबी होत आहेत. बँकेच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी ८२%कर्ज वाटप हे उत्पादक व व्यापार या कारणासाठी दिलेले आहे.

औद्योगिक आणि कृषी अर्थसहाय्याचे

आमच्या बँकेच्या अप तंत्रज्ञान अंमलबजावणी केंद्र शासनाच्या वाटप 5 % व्याज दराने अनुदान / स्तरात रुपांतर निधी योजना भारत लहान औद्योगिक विकास बँकेने सहकारी निवड केली आहे. कापड औद्योगिक क्षेत्र विकासासाठी . आम्ही देखील लघु उद्योग , सिडबी योजनेनुसार राष्ट्रीय इक्विटी फंड योजने अंतर्गत युनिट विकासासाठी आर्थिक आहेत.
आमच्या बँकेच्या नोडल नाबार्ड सदस्य आणि विकास बँकेकडून अर्थ सुविधा पात्र आहे.आम्ही नेहमी कृषी वित्त अंतर्गत भारत सरकार लक्ष्य गाठत आहेत .


मायक्रो फायनान्स

एक सामाजिक बंघीलकी म्हणून बँकेने मायक्रो फायनान्स मध्ये प्रमुख असे ६०० ग्रुप व रु. १५० लाख पेक्षा अधिक गुंतवणूक करून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आणि आम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की हि सर्व खाती नियमित आहेत व स्थिरस्थावर कार्यरत आहेत.महिला सबलीकरणाच्या उद्धेशाने बँकेने महिला बचत गटातील महिलांना 'मायक्रो फायनान्स ' कर्ज योजनेसाठी बँकेमध;मायक्रो फायनान्स कक्ष; या स्वतंत्र नवीन कक्षाची सुरवात केली आहे. अशा प्रक्रारे 'मायक्रो फायनान्स ' द्वारे महिलांना कर्ज वितरण करणारी महाराष्ट्रातील पहिलीच नागरी बँक आहे.


सामाजिक बांधिलकी

सहकारी संस्था ज्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या जिव्हाळयाची व अत्यंत जवळची संस्था असल्याने, या संस्था त्या त्या ठिकाणच्या सामाजिक उन्नत्तिकड़े लक्ष देतात. आम्हीही अशी जाणीव ठेवली असून, दरवर्षी आमच्या कार्यक्षेत्रातील सार्वजानिक वाचनालये, विविध सामाजिक संस्थाना आर्थिक मदत देत आलो आहोत.म्हणुन आम्ही आमचे ब्रिद वाक्य ;माणसांच्या मनांना विणणारी बँक; जपलेले आहे.


शाखा विस्तार

बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापलेले आहे. अद्यावत सुविधा लोकांपर्यंत पोचविण्याकरिता बँकेच्या व्यवस्थापनाने पुढील शाखा सुरु केलेल्या आहेत. भेंडे गल्ली कोल्हापूर, शिरोळ, जयसिंगपूर, पेठ वडगांव, गांधीनगर, शाहूपुरी कोल्हापुर,मुख्य शाखा इचलकरंजी, इंड. इस्टेट इचलकरंजी,काळबादेवी रोड मुंबई,लक्ष्मी रोड पुणे, हुपरी, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, कराड, वसंत मार्केट यार्ड सांगली, सूळकुड ता. कागल, गांवभाग इचलकरंजी, मुलुंड पश्चिम, मुंबई, सोलापुर, गणपती पेठ सांगली, मार्केट यार्ड पुणे, जवाहरनगर इचलकरंजी, नाशिक, कोथरूड, औरंगाबाद, लक्ष्मी औद्योगिक वसाहत हातकणंगले, लातूर, फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल, शहापूर, जालना, अहमदनगर, ठाणे , हुबळी, नावनगर-हुबळी, राजारामपुरी-कोल्हापूर, हडपसर-पुणे, भोसरी-पुणे निपाणी, आलास आणि बेंगलुरू. बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापलेले आहे. अद्यावत सुविधा लोकांपर्यंत पोचविण्याकरिता बँकेच्या व्यवस्थापनाने पुढील शाखा सुरु केलेल्या आहेत. भेंडे गल्ली कोल्हापूर, शिरोळ, जयसिंगपूर, पेठ वडगांव, गांधीनगर, शाहूपुरी कोल्हापुर,मुख्य शाखा इचलकरंजी, इंड. इस्टेट इचलकरंजी,काळबादेवी रोड मुंबई,लक्ष्मी रोड पुणे, हुपरी, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, कराड, वसंत मार्केट यार्ड सांगली, सूळकुड ता. कागल, गांवभाग इचलकरंजी, मुलुंड पश्चिम, मुंबई, सोलापुर, गणपती पेठ सांगली, मार्केट यार्ड पुणे, जवाहरनगर इचलकरंजी, नाशिक, कोथरूड, औरंगाबाद, लक्ष्मी औद्योगिक वसाहत हातकणंगले, लातूर, फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल, शहापूर, जालना, अहमदनगर, ठाणे , हुबळी, नावनगर-हुबळी, राजारामपुरी-कोल्हापूर, हडपसर-पुणे, भोसरी-पुणे निपाणी, आलास आणि बेंगलुरू.


ग्राहकांना उपलब्ध केलेल्या सेवा, सोई

ग्राहकांना उपलब्ध केलेल्या सेवा, सोई.

१) सर्व देशभरात कोठेही डी डी देण्याची सोय आहे.
२) बिल वसुलीची सोय.
३)निरनिराळ्या संस्थाचे पगार वाटपाचे काम.
४)सेफ डिपोझिट लॉकरची सोय.
५) व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे इतर बँकिंग च्या सुविधा.
६)लघु,कुटीरउद्योगांना रास्त व्याज दराने कर्ज पुरवठा.
७) तत्पर व सौजन्य पूर्ण सेवा.
८) www.ijsbank.com स्वतःची वेब साईट या द्वारे बँकेची अद्यावत माहिती.
९) हेडऑफिस व ३३ शाखा मधे कोअर बँकिंगद्वारे सेवा.
१०) मु मुख्य शाखा, औरंगाबाद, नाशिक, कोथरुड-पुणे,गांवभाग इचलकरंजी, जयसिंगपूर,पेठ वडगाव, शाहूपुरी-कोल्हापूर, कराड, गुलटेकडी पुणे, जालना, लातूर, अहमदनगर, ठाणे, डीकेटी, इंड. इस्टेट इचलकरंजी,सोलापूर व गडहिंग्लज या १७ शाखामधे एटीएम.ची सोय.
११)बजाज एलियन्स जनरल इन्श्युरन्स सर्व्हिस .
१२) मॅक्स न्यूयॉर्क लाईफ इन्श्युरन्स सर्व्हिस .
आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून सक्षम व जलद सेवा पुरविणेकरीता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कोअर बँकिंग सेवा पुरवली जातअसून येणा-या नवनवीन विकसित तंत्रज्ञानाचा वापर करुन बँकिंग सेवा गुणवत्तापूर्ण व जलद बनविण्याचे काम चालू आहे.


PRIORITY SECTOR LENDING

The bank has fulfilled its statutory obligation of lending to the "Priority Sector". Out of its total advances, 75% is given to promote industry and trade and out of its about 62% advances are for Priority Sector, the bank has been lending more than 26% to Weaker Section of the community, as per government policy.


THE BOARD OF DIRECTORS

As per the Bye-laws of the society, the bank has an elected Board of Directors comprising 19 Directors. Adequate representation is given to Weaker Section, backward classes and ladies. Four co-opted directors amongst which two are professionals and two representatives of employees, thereby the bank is acheiving the goal of Coporate Governance. The bank conducts its various function through appropriate sub committees at Head office and at branch levels. At present, श्री अशोक सौंदत्तीकर - अध्यक्ष , श्री बाबासो पाटील - उपाध्यक्ष , Shri. Purushottam Jakhotia, Shri. Ugamchand Gandhi, Shri. Sunil Haval, Shri. IlaiKalawant, Shri. Ramesh Ketkale, Shri. Ravindra Kharade, Shri. Badrinath Khot, Shri. Ahamed Mujawar, Shri. Omprakash Patani, Shri. Sachin Zanwar, Shri. Pandurang Biranje, Shri. Rajesh Patil, Shri. Chandrakant Chougule, Shri. Vilas Padale, सौ. सुजाता जाधव, Sou. Anita Kajve, श्रीमती भारती आवळे , श्री पी.टी.कुंभार -सी ई ओ .


स्थावर मालमत्ता

बँकेची इचलकरंजीत मोक्याचे ठिकाणी ५ मजली वास्तु सभासदांचे सक्रीय सह्भागान उभी आहे त्या शिवाय ओद्योगिक वसाहतिमध्ये एक इमारत आहे. शाहुपुरी- कोल्हापुर येथे शहराला साजेशी अशी व बँकेच्या लौकिकात भर टाकेल अशी वास्तु बांधली आहे. पेठ-वडगांव,गांवभाग-इचलकरंजी, शिरोळ व जयसिंगपूर येथे स्वमालकीच्या इमारती असून काळबादेवी-मुंबई व मुलुंड(प.)-मुंबई शाखेसही बँकेची स्वतःची इमारत खरेदी करुन शाखा कार्यरत आहेत.बँकेची पुणे शाखा लक्ष्मी रोड, बाजीराव रोड,कार्नरवर स्वतःच्या प्रशस्त इमारतीत कार्यरत आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय कार्यालायासाठी इचलकरंजी शहराला साजेशी अशी भव्य वास्तु उभी करणेकरीता स्टेशन रोडवरील अंदाजे एक एकर जगा खरेदी केली आहे.


प्रशिक्षण केंद्र

बँकेच्या स्वतःच्या प्रशिक्षण केंद्रातून सर्व कर्मचा-यांना बँकिंग प्रशिक्षण देणेत आले असून, प्रशिक्षणातुन कर्मचारी सक्षम बनविण्याच्या बँकेचा मानस असून, भविष्य काळात सम्पूर्ण महाराष्ट्रातील बँकिंग व्यवसायातील कर्मच्या-यांना प्रशिक्षणासाठी वर्ग सुरु करण्याचा बँकेचा मानस आहे.तसेच किमान व्याज आकारणी करीत असल्याने सभासदांना आपोआपच योग्य मोबदल्यात कर्ज उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्पादनात भरच पडत आहे व ते स्वावलंबी होत आहेत.


कोअर बँकिंग

बँकेने जयसिंगपूर येथे स्वतःच्या जागेत अद्यावत डेटा सेंटर उभे केले असून , या डेटा सेंटरला सर्व ३३ शाखा जोडणेत आल्या आहेत. कोणत्याही शाखेतुन बॅंकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे . बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून रोख रक्कम ग्राहकांना काढता येते. तसेच बँक्स नेटवर्क या एटीएम नेटवर्कचे सदस्यत्व घेतलेले असून बँक ऑफ इंडिया, अँक्सिस बँक, आयडीबीआय बँक याच बरोबर इतर बँकाच्या भारतातील कोणत्याही एटीएममधूनही ग्राहकांना रक्कम काढता येते. त्याच प्रमाणे आरटीजीएस, अँटपार चेक सुविधा, एसएमएस बॅंकिंग व इंटरनेट बॅंकिंग इत्यादी आधुनिक सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत.


सी बी एस सुविधा

We have developed the fully equiped Data center at the Jaysingpur and all branches are connected by leased line and backup line is ISDN, DR site is hosted at TJSB, Pune.

खालील सेवा सुरू आहेत .
अ) सीबीएस विभाग
ब) कोणत्याही शाखेत बँकिंग
क) टेलर प्रणाली
ड) आय बी टी- इंटरनेट branch trensactions
ई )एम.आय.एस.
फ) अँट पार चेक सुविधा
ग) मध्यवर्ती क्लीअरिंग सिस्टिम

खालील सेवा या आर्थिक वर्षात सुरु करण्यात आली आहेत
अ) बँक एटीएम नेटवर्क- Issuer Transactions.
ब) आरटीजीएस सुविधा
क) एसएमएस बँकिंग
ड) Anti Money Loundering

खालील सेवा पुढील आर्थिक वर्षात सुरु करण्यात येणार
अ) इंटरनेट बँकिंग
ब) एनएफएस एटीएम नेटवर्क - Issuer and Acquire Transactions.
क) एनईएफटी सुविधा
ड) डाटा सेंटर इतर बँकांना डाटा शेअर करते.ANTI MONEY LOUNDERING

Anti Money Loundering Software has been implemented at on Head Office.


दृष्टिक्षेपात बँक

दृष्टिक्षेपात बँक .

नोंदणी क्रमांक केपीआर/बीएनके/१०२/५.११.१९६२
स्थापना ७ फेब्रुवारी, १९६३.
रिझर्व बँक परवाना ऐसीडी/एमएच-२९७/ पी दि. २७.४.१९८२.
बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य.
प्रधान शाखा मेंन रोड, इचलकरंजी-४१६११५, जिल्हा : कोल्हापुर.BRANCH NETWORK AT A GLANCE

We offer you the 44 Branches convenience to your Banking Services all over the Maharashtra, Karnataka & Goa State. For more Info of Branches details please visit the Branch Locatorकेएआयजेएस बँक

जलद बँकिंग

इंटरनेट बँकिंग

मोबाइल बँकिंग

Data NA

एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग आपल्या बोटांच्या टोकावर बँकिंग आणते.बँकने आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग सेवा सुरू केली आहे .अधिक वाचा

एटीएम / शाखा

तक्रार निवारण केन्द्र

आपली काही तक्रार असल्यास ,संपर्क करावा हि विनंती.   अधिक वाचा
केएआयजेएस बँक
एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग नं. : +91 9225650117
लेटेस्ट ब्यालेनस इन अकौंट

अधिक जाणून घ्या »
मदत & समर्थन

कॉल सेंटर टोल फ्री नं. :
1800 233 6800

नेहमी विचारले जाणारे प्रश्न »
SSL Certificate
संपर्कात राहा

फोन नं: 91 230 2433505 - 508
ई मेल:kaijsbit@ijsbank.com

ऑनलाइन संपर्क फॉर्म »